नसरापूर येथे विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी चे उद्घाटन उत्साहात संपन्न.
नसरापूर( प्रतिनिधी):-।
विशाखा मेकअप व ब्युटी हेअर अकॅडमी नसरापूर येथे सुरू झाल्याने पंचक्रोशीतील महिलांना या उद्योग व्यवसायामध्ये प्रभावी मार्गदर्शन करून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून महिलांचा आर्थिक स्तर यामुळे उंचावला जाणार आहे. त्यासाठी महिला व युवतींनी विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस साठी आप -आपली नाव नोंदणी करून घ्यावी .येथे प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांना एक वेगळ्या रोजगाराची दिशा व संधी यातून प्राप्त होणार आहे. मेकअप आर्टिस्ट हेअर स्टायलिस्ट मीना मारणे यांनी केले.
नसरापुर ता. भोर येथे सह्याद्री सिटी, नसरापुर या ठिकाणी विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी चा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला, त्या प्रसंगी मारणे बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी विशाखा मेकअप स्टुडिओ अकॅडमीच्या संस्थापिका संचालिका विशाखा यादव तसेच हेअर आदित्य भुजबळ ,मेकअप आर्टिस्ट आर्यन गवळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.