निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालन करता. विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याकडून निवेदक विठ्ठल पवार यांचे विशेष कौतुक व अभिनंदन.

Maharashtra varta

 निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालन करता.

 विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याकडून निवेदक विठ्ठल पवार यांचे विशेष कौतुक व अभिनंदन.

 भोरमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रम.



नसरापूर ( प्रतिनिधी):-

भोर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने कोव्हीड योद्धा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना, या सन्मान सोहळ्याचे  निवेदन करणारे,विठ्ठल पवार  तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालन करत आहात असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती तथा महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या उपनेत्या  डॉ. आमदार नीलम गोऱ्हे यांनी काढले.

वर्वे ता. भोर येथील शिवनेरी मंगल कार्यालयात भोर तालुक्यात कोरोना कार्यकाळात उत्कृष्ट काम करणारे शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिचारिका ,आशा सेविका,सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना , अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी व पत्रकार यांना  कोव्हीड योद्धा सन्मान  कार्यक्रम प्रसंगी डॉ. नीलमताई गोऱ्हे  यांनी अध्यक्षीय मनोगतात  सुरुवातीलाच उल्लेख करताना ,या कार्यक्रमाला उंची देऊन कार्यक्रमाला भारदस्तपणा  आणणारे निवेदक विठ्ठल पवार आपण उत्कृष्ट सूत्रसंचालन करता असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी काढून निवेदक विठ्ठल पवार यांचा आदर्श उत्कृष्ट निवेदक व उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान करत त्यांच्या कार्याचा उचित गौरव या कार्यक्रमाच्या प्रसंगी करण्यात आला.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विठ्ठल पवार होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये व प्रभावी व परिणामकारक शब्दांमुळे या कार्यक्रमाला एक प्रकारची वेगळीच उंची आणली. 

निवेदक विठ्ठल पवार यांचे निवेदनातील स्पष्ट शब्द उच्चार, शब्दातील चपलखपणा व  त्यांच्याकडे असणारे शब्द भांडार ,आवाजात चढउतार व प्रत्येक व्यक्तीला कार्यानुरूप उंची देऊन कार्यक्रमाला साजेसे रुप ते आणण्याचं प्रभावी  काम ते करीत आहेत.

गेली चौदा वर्ष निवेदक विठ्ठल पवार हे विविध कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन करत आहेत.त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार कृषी ,क्रीडा,तथा  विविध सामाजिक उत्सव कार्यक्रम, सन्मान सोहळे, उद्घाटन समारंभ लग्न समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमांचे ते प्रभावी सूत्रसंचालन करीत आहेत.

त्यांच्या सूत्रसंचालना मुळे कार्यक्रम हा अधिक सुंदर व सुरेख होतो. कार्यक्रमात लोकांना ते निवेदनाच्या माध्यमातून खिळवून ठेवतात.भारदस्त आवाज,विविध शब्दतरंग अशी त्यांच्या निवेदनाची खास वैशिष्ट्य आहे.

जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे व पंचायत समिती सदस्या पुनम पांगारे आणि भोर तालुका शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे व बाळासाहेब चांदेरे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, युवराज जेधे, महिला आघाडी संघटक स्वाती ढमाले, संगीता पवळे, निशा सपकाळ, सुवर्णा करंजावणे, स्वाती शिळीमकर, अविनाश बलकवडे,आदित्य बोरगे  अमोल पांगारे, नितीन सोनवणे, गणेश धुमाळ, नारायण कोंडे, महेश कोंडे, दत्तात्रय देशमाने यावेळी उपस्थित होते.

To Top