पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदस्यासाठी सरपंच अप्पा धनावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
खेडशिवापुर ( प्रतिनिधी)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना ग्रामपंचायत सरपंच पदातून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस दि.13 ऑक्टोबर हा होता. ग्रामपंचायत सरपंच पदातून वेळू ता. भोर येथील सरपंच आप्पा धनवडे यांनी दि. 13 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
यावेळेस जीवन धनावडे,सोमनाथ सोमाणी,माऊली पांगारे,हिरामण पांगारे,मंगेश सुर्वे,ग्रामपंचायत सदस्य अमोल पांगारे,चंद्रकांत पांगारे,गणेश मालुसरे यावेळेस उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक यांमधून 22 सदस्य नगरपरिषद क्षेत्रात 1 सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच मधून 7 सदस्य निवडण्यात येणार आहे. पीएमआरडीए नुकताच हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे.
नेमकी कोणत्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी होणार आहे ते निश्चितच आगामी दिवसात पाहण्यास मिळणार आहे. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दिनांक 29 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवारांना भरता येणार आहे. या निवडणुकीसाठी 978 मतदार आहे. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पीएमआरडीए राज्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद लहान नागरी क्षेत्र नगरपरिषद आणि मोठी नागरी क्षेत्र महानगरपालिका गटातून 30 सदस्य निवडून द्यायचे आहे.