चोरांचा अंगणवाडीत प्रवेश.
करंदी खे. बा. अंगणवाडीत चोरी.
चोरट्यांनी चोरले हजारो रुपयांचे साहित्य.
नसरापूर (प्रतिनिधी):-
करंदी खे. बा. गावच्या हद्दीत अंगणवाडी क्रमांक 4 चा दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून अंगणवाडी मध्ये प्रवेश करून एलजी कंपनी चा 43 इंच आता स्मार्ट टीव्ही व भारत कंपनी सिलेंडर ची टाकी चोरून नेले. हजारो रुपयांची वस्तू असलेली टीव्ही व सिलेंडर चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. राजगड पोलिस स्टेशन नसरापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत करंदी खे. बा. अंगणवाडी सेविका उषा खाटपे यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे तक्रार फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धोंडे हे अधिकचा तपास करीत आहेत.
या बाबत राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीचा तपासाची चक्रे राजगड पोलीस स्टेशनने वेगाने फिरवले असून लवकरच आरोपीपर्यंत पोलीस पोचणार आहेतच.
शाळांची व अंगणवाड्यांची सुरक्षा रामभरोसे...
ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी जिल्हा परिषद शाळेला व अंगणवाडी शाळेला हजारो रुपयांचे भौतिक सुविधा-साहित्य उपलब्ध करून दिले. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही ची कमतरता आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी ग्रामपंचायत करंदी खे. बा. यांनी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसून घेण्यात यावा. व गावातील सीसीटीव्ही देखील कार्यान्वित करावा, असे करंदी खे.बा. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.