विरवाडीच्या उपसरपंचपदी ज्योती बांदल.
नसरापूर: (प्रतिनिधी)
विरवाडी, दिडघर, केतकावणे (ता. भोर) ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्योती सचिन बांदल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच विशाल शिळीमकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची निवड झाली. सरपंच सुनीता सोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत दिडघर येथील ग्रामपंचायत सदस्या ज्योती सचिन बांदल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक अंकुश लहामटे, माजी उपसरपंच विशाल शिळीमकर, समीर दिघे, संतोष नाना शिळीमकर,मंदाकिनी खंडाळकर, सविता सोंडकर, स्मिता शिळीमकर, अमर इंगवले, माजी सरपंच विजय शिळीमकर, पोलिस पाटील राजू सोंडकर, सचिन बांदल, भोर तालुका वारकरी संप्रदायाचे कोषाध्यक्ष शिवाजी आबा जामदार,शांताराम दिघे, गोकूळ दिघे, भैरू दिघे, मोहन सोंडकर, अर्जुन बांदल, विश्वास सोंडकर आदी उपस्थित होते.
विरवाडी केतकावणे गावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे. ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना तसेच गावकर्यांना विश्वासात घेऊन आगामी काळात प्रभावी आणि दर्जेदार विकास कामे करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.