पुणे येथे प्रहार पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ

Maharashtra varta

 संतोष आप्पा साठे  प्रहारचे नगरसेवक होणार:--- अनिल गवांडे यांचे गौरवोद्गार.

पुणे येथे प्रहार जनशक्ती पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ



 पुणे (प्रतिनिधी) :-

आंबेगाव पठार तथा पुणे शहरात संतोष आप्पा साठे आणि कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात पुणे शहरात उत्कृष्ट काम केले आहे. जनहिताला व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून गोरगरीब, दिव्यांगांच्या बाबत प्रभावीपणे काम केले आहे. त्याचबरोबर पुणे शहरातला एक चांगला रुग्णसेवक म्हणून संतोष आप्पा साठे हे सर्वांना परिचित आहेत .एक नगरसेवक ज्या पद्धतीने प्रभागात काम करीत असतो, त्याच पद्धतीचा काम करणारा प्रहार पक्षाचा पदाधिकारी संतोष आप्पा साठे हे आगामी काळात आपल्याला प्रहारचे नगरसेवक दिसणारच आहेत असे असा आशावाद महाराष्ट्र राज्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनिल गवांडे यांनी काढले.


आंबेगाव पठार येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी अध्यक्ष अनिल गवांडे बोलत होते ते पुढे म्हणाले की प्रहारचा कार्यकर्ता हा सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या व जनतेविषयी ची तळमळ असणारा आहे म्हणूनच कमी कालावधीत राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली असून तेच काम आगामी काळात आपल्या सर्वांना करायची आहे असे त्यांनी प्रतिपादित केले या कार्यक्रमाच्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनंत काळे,उपाध्यक्ष मंगेश ढमाळ तसेच पुणे शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे व त्यांचे सहकारी व पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध तालुक्यांचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुग्णसेवक उमेश महाडिक यांनी करून  आभार पुणे शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी मानले.

यावेळेस  रुग्णसेवक उमेश महाडीक पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पुनम तावरे ,शिवसेना खडकवासला विभाग प्रमुख अनिल भोसले ,पुणे शहर युवाउपाध्यक्ष मिथुन आवारे पुरंदर युवा तालुका अध्यक्ष आकाश सणस भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते पुणे युवा शहराध्यक्ष मनोज हरकळ पुणे शहराध्यक्ष सुनील गोरे पुणे शहर सरचिटणीस संदीप नवले पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख सुधीर अंकुशे सामाजिक कार्यकर्ते संतोष खोपकर सामाजिक कार्यकर्ते पंकज जगदाळे हरी फडतरे अमोल मानकर नितीन पगार प्रकाश मोरे संतोष कारले पतीत पावन संघटना विजय शिरसागर चारू पाटोळे अक्षय पवार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कोंडे सचिन बांदल तसेच योगेश राजगुरू शंकर लोखंडे तुषार दळवी गुरु चव्हाण यश नलावडे अजय शिरसागर रोहन जाधव ओमकार काळे जयराज शिळीमकर विशाल देशमुख भुषन दळवी राहुल चव्हाण खडू कांबळे शंकर चव्हाण धनकवडी महिला अध्यक्ष राधा सोनी दिपाली गायकवाड नंदनी कुमकर उपस्थित होते.

To Top