आदित्य बोरगे यांच्या वतीने माळेगाव येथे "शासन आपल्या दारी" कार्यक्रम संपन्न.

Maharashtra varta

 आदित्य बोरगे यांच्या वतीने  माळेगाव येथे  "शासन आपल्या दारी" कार्यक्रम संपन्न



नसरापूर( प्रतिनिधी)

दि.23 रोजी माळेगांव ता.भोर येथे आदित्य बोरगे मित्रपरिवाराच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत असून विविध शासकीय योजना गरजुंपर्यंत पोहचवण्यासाठी मदत होत आहे असे मत मत कुलदीप तात्या कोंडे यांनी व्यक्त केले.

      यावेळी शिवसेना भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे,कामगार नेते गणेश धुमाळ, युवासेना तालुका प्रमुख अमित गाडे,अमोल मोरे,योगेश गाडे,विशाल खुटवड,संतोष भिलारे,सागर राऊत,सचिन बांदल,महादेव भिलारे,शहाजी खंडाळकर,बाजीराव पांगारे,मल्हारी पांगारे ,विजय कव्हे,किरण सुतार,नितेश चव्हाण,अक्षय बोरगे,माऊली कोंढाळकर,शांताराम खाटपे,अशोक शेडगे, भानुदास थिटे व आदित्य बोरगे मित्र परिवार उपस्थित होते.

To Top