सासवड भूमी अभिलेख कार्यालयास सुरेखा ढवळे यांनी दाखवला प्रहारचा प्रहार.
......त्या शेतकऱ्याची मोजणी भूमी अभिलेख स्वखर्चाने करणार.
सासवड( प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ताई ढवळे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी यांची अर्धवट केलेली मोजणीस जबाबदार असलेले भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सासवड यांनी स्वतःच्या खिशातून तीन हजार रुपये भरून दिवाळीनंतर मोजणी करून हद्द निश्चित करून दिले जाईल ,असे आश्वासन देत प्रहार च्या पुढे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी शरण येत शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे सांगून प्रहार संघटनेने आंदोलन मागे घेत "प्रहारचा प्रहार" शासकीय कार्यालयात दिसून आल्याची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होऊन सर्वसामान्य लोकांना प्रहार न्याय देत असल्याची भावना निर्माण झाली असून सुरेखा ढवळे ह्या कार्यक्षम आहेतच असे सामान्य लोकांच्या तोंडून वाक्य बाहेर पडले.
भूमिअभिलेख कार्यालय पुरंदर येथे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी संदर्भात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यकक्षा सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय पोमण रा. पिंपळे ता.पुरदंर जि.पुणे यांनी 16/10/2021रोजी मोजणी विभागाकडे अर्ज दाखल केला होता, त्या अनुषंगाने त्यांच्या शेत जमिनीची हद्द कायम अतिक्रमण काढण्यासाठी 12 मार्च 2019 रोजी मोजणी करण्यात आली, 29 जुलै 2019 रोजी हद्द कायम करण्यात आली 31/07/2020 रोजी उपअधीक्षक भूमिअभिलेख पुरंदर यांनी अर्ज निकाली काढण्यात आला, परंतु मोजणी करताना सदर शेजारील गटात झालेल्या अतिक्रमण झालेला गट न दाखवता खुणा कायम करण्यात आल्या. रंगरंगोटी करून अतिक्रमण न दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पैसे भरून मोजणी करण्याचे सांगितले व मोजणी करून अर्ज निकाली काढणारी अधिकारी व कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या बदली झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत ,यावेळी पिंपळे येथील दत्तात्रय सोमण यांचे मुलगा राजेंद्र पोमण यांनी प्रहार संघटनेकडे लेखी अर्ज केला होता, त्या अनुषंगाने आठ दिवसापूर्वी भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर येथे आंदोलनाची पत्र देण्यात आली होती, त्याच्या अनुषंगाने उपअधीक्षक नानासाहेब कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकरी व प्रहार संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व शेतकरी मोजणीसाठी पैसे भरणार नाही, असे प्रहार संघटनेने निर्धार केल्यामुळे भूमी अभिलेख अधिकारी नानासाहेब कांबळे नगर भूटान शिरस्तेदार उप अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय पुरंदर यांनी स्वतःच्या खिशातून तीन हजार रुपये भरून शेतकऱ्याची मोजणी दिवाळीनंतर करून हद्द व खुणा दाखवून देण्याचे आश्वासन दिले व येणार्यास प्रत्येक शेतकऱ्याला समाधानकारक उत्तरे दिली व तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .
या वेळी सासवड पोलीस स्टेशन चे मुजावर व भगत यांचे मोलाचं सहकार्य लाभले, यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी वीर ,राउतवाडी सासवड ,झेंडे वाडी येथील शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव संदीप जगताप, शिवाजी शिंदे, रेखा धुमाळ नाना झेंडे,अलका भांडवलकर वसंत दिवशे नंद कुमार गिते ,वैभव क्षीरसागर,अनिता जाधव आधी बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.