त्या अपघातग्रस्त युवकाचे वाचवले प्राण.
आमदार पुत्र पृथ्वीराज थोपटे यांनी दाखवले प्रसंगावधान.
भोर (प्रतिनिधी)
भोर-कापूरहोळ रस्त्यालगत असलेल्या माळवाडी गावच्या जवळ मोठा अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे चिरंजीव पृथ्वीराज संग्राम थोपटे यांनी त्या ठिकाणी चारचाकी स्वतःची गाडी थांबवून त्या युवकाला स्वतःच्या गाडीतून थेट भोर येथील हरजीवन हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल करत त्या जखमीग्रस्त युवकाचे प्राण वाचवत खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवत समाजासमोर आदर्श उभा केला केला आहे. त्या माणुसकीचे दर्शन व प्रेरणा युवकांना निश्चितपणे दिशा देणारी असल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या जखमीग्रस्त युवकाचे प्राण वाचवलेबद्दल नागरिक व युवक यांच्याकडून पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
जखमींग्रस्त युवकास पृथ्वीराज थोपटे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करताच हॉस्पिटलचे डॉ.अमित यांच्याशी चर्चा करुन तात्काळ उपचार त्या युवकावर करायला सांगितले. त्या युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. डॉ.अमित व त्यांच्या हरजीवन हॉस्पिटल च्या टिम ने त्या युवकावर तात्काळ उपचार केल्यामुळे प्राण वाचले.या प्रसंगी प्रसंगावधान पृथ्वीराज थोपटे यांनी दाखवल्यामुळे तरुणाचा जीव वाचला.
अपघातगस्त युवक हा संगमनेर गावातील आहे ,हे समजताच पृथ्वीराज थोपटे यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळुंके यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्या अपघातगस्त युवकाच्या कुटूंबीयांना दवाखान्यात येण्यास सांगावे. . घाबरण्याचे कारण नाही. सर्वोतपरी उपचारासाठी काही अडचण असल्यास मदत करणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले. माणुसकीचे दर्शन घडवत पृथ्वीराज थोपटे यांनी या तरुणाला तात्काळ मदत केल्यामुळे त्या तरुणावर वेळेत उपचार झाले व जीव वाचला . अपघातगस्त कुटुंबियांनी पृथ्वीराज यांचे आभार मानले. तसेच ही घटना नागरिकांना समजल्यावर संगमनेर-माळवाडी पंचक्रोशी मध्ये पृथ्वीराज थोपटे यांचे कौतुक सर्व ग्रामस्थ,नागरिक करत आहेत