पुणे येथे प्रहार पक्षाची आढावा बैठक संपन्न.

Maharashtra varta

 पुणे  शहर व जिल्ह्यात प्रहारचे नगरसेवक , जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य  असणार:-

पुणे येथे प्रहार पक्षाची आढावा बैठक संपन्न.



पुणे ( प्रतिनिधी):-

सन 2022 मध्ये पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, प्रहारचे सामाजिक व राजकीय काम जनतेच्या जनतेपर्यंत व तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा, त्यामुळे पुणे  शहर व जिल्ह्यात प्रहारचा नगरसेवक , जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य  असणार आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनिल गवांडे  यांनी केले.


पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या 13 तालुक्याचा   व पुणे शहराचा आढावा  बैठकी  आयोजित करण्यात आली होती.त्यावेळेस गावंडे बोलत होते.

यावेळेस पुणे  जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष व  युवक  विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच युवा कार्यकारणी च्या विस्तारासाठी सुयोग्य कार्यकर्त्यांची निवड करून आपल्या कामाची उंची वाढवावी.प्रहार पक्षात व समाजात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यास पदाच्या माध्यमातून न्याय दिला जाईल,असे प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल गवंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक  गौरव दादा जाधव, पुणे जिल्हा संघटक नीरज कडू, पुणे जिल्हाध्यक्ष आनंदराव काळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, पुणे जिल्हा सल्लागार प्रेमजीभाई पटेल, पुणे शहराध्यक्ष सुनील गोरे, योगेश महाराज राऊत,पुणे शहर कार्याध्यक्ष रोहित भोसले, पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप ठाकूर , पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ,नवनाथ माने, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पुनम तावरे ,पुणे शहराध्यक्ष मीनाताई धोत्रे, पुणे शहर उपाध्यक्ष सायली शिंदे ,पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्षा निर्मलाताई भंडारी, पिंपरी-चिंचवड महिला उपाध्यक्ष छाया ताई बागुल ,पिंपरी-चिंचवड सरचिटणीस रामभाऊ कुकडे, पिंपरी-चिंचवड सचिव विशाल भाऊ फडतरे ,भोसरी विधानसभा प्रमुख संदीप जाधव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बापू नवले, पुणे जिल्हा प्रहार युवा कार्याध्यक्ष संतोष आप्पा साठे रुग्णसेवक नयन पुजारी, पिंपरी-चिंचवड प्रमुख विनोद गायकवाड, पुणे जिल्हा प्रमुख विद्यार्थी शिवराज काळभोर ,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आशिष सगळे, पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे वस्तीग्रह लक्ष्मण दसवडकर, पुणे वस्तीगृह कार्याध्यक्ष तानाजी जाधव, पुणे शहराध्यक्ष कामगार आनंद जगताप, पुणे शहराध्यक्ष रोजगार संदीप शिंगोटे, पिंपरी चिंचवड शहर चिटणीस योगेश कल्याणकर ,पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष लक्ष्मण सोनार, पुणे कॉन्ट्रॅक्ट कार्याध्यक्ष मेहबूब शेख, प्रवीण खरात ,संगीताताई शेडगे, हवेली तालुका अध्यक्ष महेश कणकुरे, भोर  तालुका अध्यक्ष संतोष मोहिते, दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे ,इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत, जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष  कबडी, आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव ,खेड तालुका कार्याध्यक्ष सुनील जाधव ,शिरूर तालुका अध्यक्ष राहुल वाळके, पुरंदर तालुका अध्यक्ष महादेव कापरे, पुणे जिल्हा कामगार अध्यक्ष फारुख भाई पठाण,भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे, व प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

To Top