भेलके महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा.

Maharashtra varta

 भेलके महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा.



नसरापूर ( प्रतिनिधी)

शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर आणि दीक्षा कंपनी,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गॅस सुरक्षा अभियान राबविण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडर हाताळतांना काही मानवी चुकांमुळे मोठे स्फोट होऊन मोठ्यामोठ्या घटना घडून अनेक लोक मृत्युमुखी पडतात.त्यामुळे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या गृहिणींनी  काळजी घेतल्यास मोठी दुर्घटना टाळू शकते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी आपले प्रास्ताविक करतांना मांडले.

दीक्षा कंपनीचे मोईन मुलाणी यांनी गॅस सिलेंडर किंवा गिजर सिलेंडर घराबाहेर ठेऊन त्याची जोडणी स्वयंपाक घरातील शेगडीशी असावी.सिलेंडर नेहमी वजन करूनच घ्यावा,प्रत्येक सिलेंडरवर त्याची मुदत दिनांक असते सिलेंडर घेतेवेळी ते चेक करून घ्यावे.सिलेंडर वरील पिवळे कागद फक्त धुळीपासून सुरक्षा करण्यासाठी आहे.शासनाने रबरी गॅस पाईपवर बंदी आणलेली असून नवीन तीन स्तरांची आय.एस.आय.मानांकन असलेला गॅस पाईप वापरावा अशा सूचना केल्या.त्याचप्रमाणे शेगडी धुतांना निरमा पावडर वापरू नये फक्त स्वच्छ फडक्याने पुसून घेणे.स्वयंपाक करतांना नायलॉन,टेरिकॉट व सिल्कचे कपडे वापरू नयेत.

घरगुती गॅस सिलेंडर दुर्घटना झालीच तर त्यांच्या निकषांमध्ये बसणाऱ्या कुटुंबास किंवा हानी झालेल्या घटकास शासन चाळीस लाख रुपये विमा देते याची सर्वाना माहिती असावी असे मुलाणी यांनी सांगितले. दर सहा महिन्यांनी गॅसची शेगडी दुरुस्त तसेच सर्व्हिसिंग करून घ्यावी जेणेकरून पुढे प्रॉब्लेम निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घरामध्ये  सूक्ष्म गॅस गळती होत असेल तर आपणांस त्याचा वास जाणवतो मग अशावेळी दारे खिडक्या उघडाव्यात आणि गॅसचा रेग्युलेटर बंद करून आपण सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच लाईट चालू असेल तर त्याची बाटले चालू बंद करू नये अशा सूचना दीक्षा कंपनीकडून आलेले मोईन मुलाणी यांनी केल्या. यावेळी दीक्षा कंपनीचे मोईन मुलाणी,ओंकार ब्रम्हे,वाजिद मुलाणी आणि जुनेद मुलाणी यांनी उपस्तित सर्वाना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि डॉ.हिमालया सकट,डॉ.राजेंद्र सरोदे,प्रा.सहदेव रोडे,प्रा.पौर्णिमा कारळे,प्रा.भगवान गावित,डॉ.सचिन घाडगे,प्रा.प्रवीण गायकवाड,प्रा.संदीप लांडगे,प्रा.प्रल्हाद ननावरे,प्रा.रोशनी पवार प्रा.रफतनाज डांगे,प्रा.दयानंद जाधवर  आदी.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जगदीश शेवते यांनी केले.

To Top