विद्यार्थ्यांचे शाळे बद्दलचे आकर्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये कायम.केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे .

Maharashtra varta

 विद्यार्थ्यांचे शाळे बद्दलचे आकर्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये कायम.केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे .


भोर (प्रतिनिधी)

भोर पंचायत समिती विकास गटातील इयत्ता पाचवी पासून चे वर्ग सुरू झाले असून प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करतशाळांनी  विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांचे शाळे बद्दलचे आकर्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये कायम असल्याचे दिसून आले, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी केले.

दि.4 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, पालक,नागरिक,सामाजिक कार्यकर्ते ,अधिकारी उपस्थित  होते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल  देत, ढोल ताश्याच्या नादात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी  भोर पंचायत समिती तथा शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली होती. भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांत विविध उपक्रम राबविण्यात आले.

दोन दिवसांपासुनच शाळा सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांना घरोघरी जावुन त्यांचे थर्मल आणि पल्स तपासणी मोहीम घेण्यात आली होती. आज विद्यार्थी स्वागत समारंभात काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पुस्तक वह्यांचे देखील वाटप करण्यात आले. तब्बल १८ महिन्यांनतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले.

त्यामध्ये भोर पंचायत समिती विकास गटांतील  बालवडी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संबंधी घ्यावयाची काळजी आणि  मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टन्सिंग याविषयी माहिती दिली.

 पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग शासकीय आदेशान्वये सुरु झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून बालवडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी मास्क,अॅाक्सिमीटर तापमापक उपल्ब्ध असून विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करुन मार्गदर्शन केले जाते.याबद्दल केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी समाधान व्यक्त करुन स्वानंदी शिक्षणातील सजगता या विषयाचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक घेतले.याप्रसंगी मुख्याध्यापक भिमराव शिंदे,महादेव बदक,आनंदा सावले,अंजना घोलप आणि विद्यार्थी उपस्थित होते.

To Top