शंकरभाऊ मांडेकर युवा मंचाच्या वतीनं रविवारी "होम मिनिस्टर" कार्यक्रमाचे आयोजन
●पिरंगुट( प्रतिनिधी):-न्यूज वार्ता●
शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीनं येत्या रविवारी (दि. १३रोजी) मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे "होम मिनिस्टर" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उबाठा) चे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या कार्यक्रमात महिलांना सन्मानित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेत. ज्यामध्ये लकी ड्रॉ द्वारे विजेत्या महिलेस फोर व्हीलर गाडी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ४ वाजता होईल. भोर, वेल्हा आणि मुळशी विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना शंकर मांडेकर म्हणाले की, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी
होम मिनिस्टर विजेत्या पाच महिलांना मानाची पैठणी प्रदान केली जाईल. तर तीन ही तालुक्यातील प्रथम क्रमांक विजेत्या महिलेस टू व्हीलर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक विजेत्या महिलांना अनुक्रमे एलईडी टीव्ही आणि फ्रीज पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना बक्षिसे दिली जाणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मांडेकर यांनी केले आहे.