या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश !
भोर (प्रतिनिधी):-●संपादक न्यूज वार्ता●
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यसम्राट आमदार .संग्राम थोपटे यांच्याशी अनेक लोक जोडले जात आहेत. लोकांची साथ विकासाला असून त्यांचा हा विश्वास काम करण्यासाठी संग्राम थोपटे यांना बळ देत आहे असे विचार युवा नेते पृथ्वीराज थोपटे यांनी केले.
भोर तालुक्यातील निगडे येथील युवकांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी संग्राम थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सा.कार्यकर्ते दामोदर रामचंद्र मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मारुती चिकणे, मच्छिंद्र लक्ष्मण कुंभार, राजेंद्र किसन जाधव, श्रीकांत रामदास सुके, महादेव आप्पाजी जाधव, गणेश बळीबा सुके, सुजित आनंदा जाधव, पुष्कर किसन बारणे, शहादेव लक्ष्मण गायकवाड, विकास साहेबराव मालुसरे, अनिकेत शाहीर चिकणे, सचिन हरिभाऊ मालुसरे, समीर उत्तम चिकणे, सनी नारायण मालुसरे यांचा समावेश आहे.