हरिशचंद्री शाळेच्या वॉल कंपाउंड ला साडेदहा लाखांची मंजूरी, भूमिपूजन समारंभ संपन्न.●

Maharashtra varta

 हरिशचंद्री शाळेच्या वॉल  कंपाउंड ला साडेदहा लाखांची मंजूरी, भूमिपूजन समारंभ संपन्न.


कापूरहोळ (15) :-

शासनाचा या निधीच्या साहाय्याने शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये  वॉल  कंपाउंड व उर्वरित सुधारणा व दुरुस्त्या चांगल्या रीतीने करा, गावासाठी लागणारा विकासकामांचा निधी भविष्यकाळात देखील मोठ्या प्रमाणावर देऊ असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केले.

 पुणे जिल्ह्यातील  भोर तालुक्यातील हरिशचंद्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी साडेदहा लाख रुपयांची निधी मंजूर झाला असून  हा निधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे. त्यांचे हस्ते भूमिपूजन झाले.त्याप्रसंगी बोलत होते. या निधीच्या साहाय्याने शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

या निधीच्या भूमिपूजन समारंभाला पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे व मान्यवर तसेच , ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक,पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य जय हनुमान तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमास ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बाळासाहेब चांदेरे यांनी शाळेच्या व गावच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, उपस्थितांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भोर तालुका युवा सेनेचे अध्यक्ष स्वप्निल गाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.राधा विशाल पाचकाळे यांनी मानले.

To Top