पूरहानी कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत मुळशी तालुक्यातील कामांसाठी ९ कोटी ७० लक्ष रुपये निधी मंजूर - आमदार संग्राम थोपटे.
पुणे (प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता
भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे आमदार मा.श्री.संग्राम थोपटे यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यामुळे भोर विधानसभा मतदार संघातील मुळशी तालुक्यातील रस्ते व पूल या कामांसाठी रक्कम रु.९ कोटी ७० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
दासवे लवासा टेमघर लव्हार्डे मुठा रस्ता प्र. जि. मा. २७ किमी १७/००० ते १७/०९० मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९७.३३ लक्ष रुपये. ,दासवे लवासा टेमघर लव्हार्डे मुठा रस्ता प्र. जि. मा. २७ किमी २/१७/०९० ते १७/१६० मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९६.४१ लक्ष रुपये. पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी १०/०० ते १०/१५० मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती आणि रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९९.०४ लक्ष रुपये.
पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २०/०० मोऱ्यांची दुरुस्ती करणे तालुका मुळशी : ९८.७४ लक्ष रुपये.,पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २६/०० (पडळघर) मध्ये पुलाची दुरुस्ती करणे तालुका मुळशी : ९९.२८ लक्ष रुपये.
,पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २५/८०० ते २६/००० व २६/०२० ते २६/१५० (पडळघर) मध्ये पुलाच्या अप्रोच रस्त्याची दुरुस्ती करणे तालुका मुळशी : ९९.८ लक्ष रुपये. ,पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २७/१०० ते २७/१५० (पडळघर) मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९८.४९ लक्ष रुपये. , पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २७/१५० ते २७/२०० (पडळघर) मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ८४.६१ लक्ष रुपये. , पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २७/३०० ते २७/३६० (पडळघर) मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९९.०९ लक्ष रुपये. , पानशेत वरसगाव मोसे साईव पलसे अद्याळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता प्र. जि. मा. १६४ किमी २७/३६० ते २७/४३० (पडळघर) मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती व रस्त्याची सुधारणा करणे तालुका मुळशी : ९७.६१ लक्ष रुपये.
या रस्त्यांच्या व पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, दुर्गम व डोंगरी असलेल्या मतदार संघाचा विकास घडवून आणण्यासाठी विविध प्रकारचे निधी उपलब्ध करून अनेक कामे मार्गी लावली जातील व त्यातून मतदार संघातील जनतेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. नाबार्ड, केंद्रीय मार्ग, राज्य मार्ग, आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास निधी, दलित वस्ती, राष्ट्रीय पेयजल योजना व जिल्हा नियोजन अंतर्गत रस्ते व साकव अशा विविध योजना व निधींच्या माध्यमातून मतदार संघात विविध प्रकारची विकास कामे केली जाणार आहेत.)