भोर तालुक्यात संग्राम थोपटे यांचे दौरे; भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश●

Maharashtra varta

भोर तालुक्यात संग्राम थोपटे यांचे दौरे; भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश



●संपादक न्यूज वार्ता●

भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात महाविकास आघाडीचे  अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी संवाद साधला. दुर्गाडी, कुडली बु, कुडली खु, शिरवली, कंकवाडी, धारांबे या गावांमध्ये त्यांचे जंगी  स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी 'संग्रामदादा तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है.' असे उद्गार काढत त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, कुडली बुद्रुक येथील भोर तालुका भाजप संयोजक शिवाजी कंक, लहू कंक, अजित कंक, गोविंदा कंक, श्रीपत कंक, नवनाथ कंक, बळी कंक व सिद्धिविनायक मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




To Top