आमदार संग्राम थोपटे यांचा भोर तालुक्यातील दौरा
संपादक न्यूज वार्ता नेटवर्क
आमदार संग्राम थोपटे यांचा भोर तालुका गावभेट दौऱ्यावर असताना स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक वाडा येथील स्मारकाचे मनोभावे दर्शन घेत दौऱ्याची सुरुवात केली. तसेच भुतोंडे, डेरे, मळे येथे ग्रामस्थांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्थांनी आपुलकीने केलेल्या स्वागताचा सन्मान करत आभार मानले. भुतोंडे हे ऐतिहासिक वारसा लाभेलेले गाव आहे. या गावात सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आहे. त्याठिकाणी शिवसृष्टी व्हावी यासाठी खासदार आदरणीय उदयनराजे भोसले महाराज यांना निमंत्रित करून प्रयत्न करण्यात आले. हे काम पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी पुरातत्व विभाग, केंद्र व राज्य सरकारकडे कायम पाठपुरावा सुरू आहे. असे संग्राम थोपटे म्हणाले .
मळे गावातील महादेववाडी सारख्या ठिकाणी गाडी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. पाणी उपलब्ध नव्हते परंतु आपण येथे अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. महादेववाडी, सुतारवाडी येथे अंगणवाडी आणि रस्त्यासाठी देखील भरघोस निधी उपलब्ध करून दिला. एकूणच सोयी सुविधांनी सुजलाम सुफलाम अश्या प्रकारचं हे गाव झालं आहे.
माळवाडी ते भुतोंड रस्ता, खुणशी गृहिणी पाणी योजना, खुणशीच्या मानाई मंदिरचे काम, मानाई मंदिर रस्त्यासाठी जवळपास ८० लक्ष निधी आदी कामे आपण केली. याशिवाय धरणग्रस्तांचे दाखले मिळवून देण्याचा ऐतिहासिक काम केले त्यासाठी भाटघर धरणग्रस्त समिती स्थापन केली. तसेच विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. चांदवणे, गृहिणी खुनशी गावच्या मूलभूत सुविधासाठी देखील प्रयत्नशील असून, बोपे, वाघमाची चा रस्ता प्रास्तावित आहे या कामासाठी आगामी काळात नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
माळवाडी ते हर्णस ते भुतोंडे रस्ता अतिशय उत्तम प्रकारचा करण्यात आला असून आज राजगड असेल किंवा वेल्हा तालुक्याला जोडणारा हा रस्ता चांगल्या पद्धतीचा झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील दळणवळण सोप्पे होण्यास फायदा होणार आहे. याचंबरोबर अनेक सोयी सुविधा पुरवलेलं वेळवंड खोऱ्यातील डेरे गाव म्हणजे आदर्श म्हणून डेरे पॅटर्न ठरेल याबाबत कुठलीही शंका नाही.