स्वरूपाताई थोपटे यांनी भोर तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांशी साधला सवांद

Maharashtra varta

स्वरूपाताई थोपटे यांनी भोर तालुक्यातील पूर्व भागातील  ग्रामस्थांशी साधला सवांद



संपादक न्यूज वार्ता

भोर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी प्रणित, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या प्रचारार्थ, अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ.स्वरूपाताई थोपटे यांनी भोर तालुक्यातील पूर्व भागातील टापरेवाडी, हिंगेवाटार, गुणंद येथे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्या म्हणाल्या आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून या भागातील अनेक कामे मार्गी लागली ते स्वतः बारकाईने लक्ष घऊन काम करतात २४ तास सहज उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणजे दादा पुढील येणारा काळ आपल्या सर्वांसाठी एक मोठी संधी घेऊन येणारा आहे त्यामुळे तालुक्याचा तसेच गावागावांचा विकास अधीक गतीने होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमतांनी पुन्हा चौथ्यांदा विजयी करून काम करण्याची संधी द्यावी असे उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी आपुलकीने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. 

      याप्रसंगी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, मा.जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती रोहन बाठे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक दत्तात्रय चव्हाण, सुनीता निगडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण सहकारी उपस्थित होते.

To Top