राजगडचे मावळे स्वाभिमानीच - आ.संग्राम थोपटे.

Maharashtra varta

 राजगडचे मावळे स्वाभिमानीच - आ.संग्राम थोपटे.



न्यूज वार्ता संपादक

 २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा)तालुक्यातील कादवे, वरघड, आंबेगाव, शिरकोली, पोळे, माणगाव, टेकपोळे, घोल, दापसरे, गोंडखल, भालवडी, कोशिंमघर, आंबेगाव या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

  यावेळी

बोलताना ते म्हणाले राजगड तालुक्यातील मावळे हे स्वाभिमानी मावळे आहेत मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे यांना मोठे मताधिक्य दिले, त्यावेळी विरोधकांनी अनेक प्रलोबणे दाखविण्यात आली होती. तसेच आपण सर्वांनी मलाही आजवर चांगले सहकार्य केले त्यामुळे मला आपल्या भागातील पाणी पुरवठा योजना, रस्ते, वीज, पूल, समाजमंदिर, शाळा इमारती, सभामंडप, प्रशासकीय इमारत, राणीसाहेब सईबाई यांच्या समाधी स्थळासाठी निधी उपलब्ध करता आला महत्वाची कामे मार्गी लावता आली त्यांचबरोबर काही कामे बाकी असून पुढील पुढील काळात ती प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, दुर्गा चोरघे, सीमाताई राऊत, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, शैलेश वालगुडे, राहुल ठाकर, बापू शिर्के, लक्ष्मण तावरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top