वाई मतदारसंघासाठी बावा निवडणूक निरीक्षक
▲ खंडाळा, दि. २८ .
भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार वाई विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील नुह पी. बावा (भा. प्र.से.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निरीक्षक नुह बावा हे मतदारसंघामध्ये दाखल झाले असून त्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी स्वागत केले.
निवडणूक निरीक्षक नुह बावा यांना भेटण्यासाठी कक्ष क्र-१, शासकीय विश्रामगृह, धोम कॉलनी, सोनगिरवाडी, वाई येथे सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत भेटण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
- ●संपर्क अधिकारी :- श्री. महेश गोंजारी (कार्यकारी अभियंता, सा.बां.वि. वाई)●
- संपर्क क्र. :- ९४०३३२७९९८/८७६६७४०५४५
- ●भेटणेची वेळ :- सकाळी ०९:०० ते सकाळी १०:००●