हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी वैशाली बाजीराव वाडकर यांची बिनविरोध निवड.
आर्वी (प्रतिनिधी):-●विठ्ठल पवार सर●
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी वैशाली बाजीराव वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईचेरमनपदी समीर काकडे यांची निवड करण्यात आली आहे.
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेश काळभोर ,हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर, कार्याध्यक्ष सुरेश कटके हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रकाश चौधरी, मा. चेअरमन संजय खिरीड, विद्यमान संचालक डिंबळे सर, प्रवीण झांबरे सर, काकडे सर ,गणेश जाधव सर अवताडे सर, संदीप गायकवाड, अश्विनी पानसांभाळ मॅडम, विजय काळे सर ,हिंगणे सर ,सुपेकर सर मा. चेअरमन मोहिते सर, आर्वी गावचे पोलीस पाटील संदीप घोगरे मा. उपसरपंच प्रकाशदादा भगवान इत्यादी मान्यवर सभेच्या ठिकाणी उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन सौ वैशाली वाडकर बोलताना म्हणाल्या की
सर्व संचालकांना विश्वासात घेऊन हवेली तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करून सभासदांना हिताचे निर्णय घेऊन पतसंस्थेचे गौरवशाली वाटचाल आगामी काळामध्ये करून दाखवणार आहे.