माझ्याशी दगाफटका झाला.. म्हणून 'हा' निर्णय घेतला; कुलदीप कोंडे.

Maharashtra varta

 माझ्याशी दगाफटका झाला.. म्हणून 'हा'  निर्णय घेतला; कुलदीप कोंडे.


भोरःराम पाचकाळे.

 भोर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते कुलदीप कोंडे यांनी अपक्ष अर्ज भरला त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना शिंदे पक्षातील कुलदीप कोंडे यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली. भोरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटणार असे स्वःत एका जाहीर सभेत कोंडेंनी सांगितले होते. मात्र, ही जागा युतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेल्याने नाराज झालेल्या कुलदीप कोंडे यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चिय करीत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीची उमेदवारी देताना राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विचारात व विश्वासात घेतले नाहीत याबद्दल देखील कुलदीप कोंडे नाराज असल्याचे दिसून आले.

यामुळे आता इथले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिलेल्या शब्द पाळण्यात आला नसल्याची खंत कुलदीप कोंडे यांनी बोलून दाखवली.

To Top