कापूरहोळ बाजारपेठांमध्ये बालाजी फटाके स्टॉलवर फटाके खरेदीसाठी लहानग्यांची गर्दी.
कापूरहोळ , ता. 29 :
लहान मुलांसाठी दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळांना दिवाळीची सुट्टी लागली की फटाके खरेदीसाठी पालक व मुलांची पावले फटाक्यांच्या स्टॉलकडे वळतात. असेच चित्र सध्या कापूरहोळ बाजारपेठांमध्ये दिसत आहे. नुकत्याच शाळांना दिवाळीच्या लागलेल्या सुट्या, तोंडावर आलेली दिवाळी यामुळे कापूरहोळ ता.भोर येथे बालाजी फटाके स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होत आहे. स्वस्तात मस्त शोभेचे फटाके, आपटबार, फटाक्यांच्या माळा यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. ग्राहकांनी या ठिकाणाहून फटाके होलसेल दरात घेऊन जावेत अशी विनंती बालाजी फटाके स्टॉलचे मालक शिवप्रसाद उर्फ दादा उकिरडे यांनी केली आहे.
दिवाळीला नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व पाडव्याला पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यासाठी फटाक्यांच्या माळा, फॅन्सी फटाके, आकाशातील शॉट्स यांना मोठी मागणी आहे. १००० फटाक्यांच्या माळेची किंमत ५०० रुपये एवढी आहे. तसेच फॅन्सी फटाक्यांमध्येही ८० रुपयांपासून सिंगल शॉट्स फटाके उपलब्ध आहेत. तर मोठ्या शॉट्सची जोडी ९०० रुपयांपासून पुढे आहे.
लहान मुलांसाठी नवनवीन व्हरायटी
लहान मुलांसाठी आपटबार किंवा पिस्तूल खरेदी केले जातात. मात्र, यावर्षी मिसाईल गनची मागणी वाढली आहे. रंगीत फुलबाजे, पाऊस, भुईचक्र यांसारख्या पारंपरिक फटाक्यांसोबत यावर्षी माचिस बॉम्ब हा नवीन फटाक्यांचा प्रकार बाजारात आला आहे. लवंगी फटाक्यांप्रमाणे असणारा फटाक्यांचा हा प्रकार ग्राहकांच्या पसंतीस पडत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
‘‘दिवाळीच्या दिवशी व्यापाऱ्यांकडून आवाजाचे फटाके फोडले जातात. मात्र, तुलनेने शोभेच्या फटाक्यांना मागणी जास्त आहे. यावर्षी फटाक्यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, मागणीही वाढलेली आहे.’’
- दादा उकिरडे फटाका स्टॉल धारक
‘‘दिवाळीला शोभेचे फटाके आवर्जून खरेदी करतो. मुले लहान असल्याने आवाजाच्या फटाक्यांपेक्षा आपटबार यांचीही खरेदी आज केली आहे. यावर्षी लहान मुलांसाठी मोठी व्हरायटी बाजारात आली आहे.’’
- चंद्रकांत देवघरे ग्राहक