भोर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा सक्षम केल्या:- आमदार संग्राम थोपटे

Maharashtra varta

भोर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा सक्षम केल्या:- आमदार संग्राम थोपटे●


भोर( प्रतिनिधी):-●न्यूज वार्ता संपादक●

भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील इंगवली, आळंदे, कासुर्डी, तेलवडी, मोहरी, हातवे, तांभाड, दीडघर, पारवडी, सोनवडी, गो-हेपडळ, सांगवी, कुरुंगवडी, कोळवडी, जांभळी या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले आजचा दौरा चित्रपटसृष्टीतील सिने अभिनेते दादा कोंडके यांच्या इंगवली गावातून सुरु केला.

 या भागात वीर धरण प्रकल्प अंतर्गत समाजमंदिर, काँक्रीटरस्ते, पाणीपुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४ अंतर्गत निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हरिश्चंद्री ते तेलवडी हा बंधारा मंजूर करण्यात आला आहे, यामुळे या भागातील शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल व या बंधाऱ्यावरून चार चाकी वाहने जाण्यासाठीचा रस्ता देखील करण्यात येणार आहे, तसेच जांभळी येथील बांधाऱ्याचे देखील काम सुरु आहे, PMRDA अंतर्गत त्याठिकाणी ४५ लक्ष निधीतून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले.

   कासुर्डी येथील WOM या कंपनीच्या व्यवस्थापना संदर्भात काही अडचणी असल्यामुळे ते काम थांबले असून या ठिकाणी साधारणता दोन हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याकारणाने त्यासंदर्भात विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.  त्याचप्रमाणे विशेष करून कासुर्डी-हातवे-तांभाड रस्त्याचे काम मार्गी लावता आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कासुर्डी गावचे उपसरपंच तुकाराम उरणकर यांच्यासह गणेश पांडुरंग मालुसरे, सोमनाथ दगडे, बळीराम मालुसरे, नामदेव देवकर यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले.

 यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, लहूनाना शेलार, मदन खुटवड, सोमनाथ वचकल, अरविंद सोंडकर, किशोर बांदल, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

भोर विधानसभेच्या प्रचार रणधुमाळीत महाविकास आघाडी पुढे  केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा - संग्राम थोपटे

To Top