भोर तालुका - मायबाप जनतेच्या साथीने पुन्हा एकदा विजयाची पायाभरणी!

Maharashtra varta

  भोर तालुका - मायबाप जनतेच्या साथीने पुन्हा एकदा विजयाची पायाभरणी!



भोर (प्रतिनिधी):-

भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील मोहरी बु, हातवे बु, हातवे खु, तांभाड, दिडघर, पारवडी येथे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यानी आपुलकीने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. 

या सर्व गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण विविध विकासकामे मार्गी लावली. पीएमआरडीए अंतर्गत जवळपास १ कोटी रुपयांची कामे पूर्ण करता आली. मौजे तांभाड येथे कातकरी वस्तीवरील रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना आदी कामे राबवता आली. गावातील ग्रामपंचायत इमारतीचे काम देखील लवकरच मार्गी लागणार आहे. 


दीडघर येथे रस्त्याची प्रमुख समस्या गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत होती. आपण दीडघर ते हातवे या रस्त्यासाठी ३५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. याकामामुळे परिसरातील दळण वळण आता अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल. पारवडी येथे प्रामुख्याने रस्त्याच्या समस्या जाणवत होत्या येथे आपल्या माध्यमातून संपूर्ण गावात सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यात आले. हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे असणारे असल्याने त्याचा मोठा फायदा होईल.  

पारवडी येथे जिल्हा परिषदची काही रक्कम आणि पंतप्रधान सडक योजनेची रक्कम असताना काम करण्याची इच्छा होती पण जमीन काळवट असल्यानं रस्ता टिकत नाही म्हणून जिल्हा परिषदने पुढाकार घेतला नाही. आता पीएमआरडीएच्या माध्यमातून काँक्रिटीकरण करण्याचा आपला मानस आहे. आगामी काळात पाणी पुरवठा योजना, बंधाऱ्याचे पाणी, गुंजवणी कॅनॉल बंद पाईपलाईनद्वारे कशाप्रकारे आणता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे.


 संपूर्ण हातवे गाव आपल्या पाठीशी असून, महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.


To Top