आमदार संग्राम थोपटे यांचा दौरा उत्साहात संपन्न
राजगड तालुक्यातील चिरमोडी, भागीनघर, मंजाई आसणी, आसणी दामगुडा येथे आमदार संग्राम थोपटे हे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यानी आपुलकीने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
या परिसरात झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे जीवन सुकर झाले आहे गावांच्या विकासाचा कायापालट झालेला आहे असे यावेळेस ग्रामस्थांनी बोलताना सांगितले त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम थोपटे यांना सलग तीन टर्म आम्ही साथ दिलेली आहे याही वेळेस आम्ही संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी मतदान करू असे सांगितले
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.