वाजेघर पंचक्रोशीतील ग्रामस्थ विकासकामांमुळे समाधानी
(राजगड ):-●संपादक न्यूज वार्ता"●
संग्राम थोपटे यांचा राजगड तालुका - वाजेघर परिसर गावभेट दौरा
भोर विधानसभा मतदारसंघातील राजगड तालुक्यातील वाजेघर बुद्रुक, वाजेघर खुर्द, लव्ही, मेरावणे, साखर, घावर, मांगदरी, कारंजावणे आदी ठिकाणी •आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
वाजेघर बुद्रुक गावची भौगोलिक परिस्थिती दुर्गम डोंगरी स्वरूपाची आहे. याठिकाणी गेल्या पाच वर्षांत येथे अनेक विकासकामे झाली आहेत. पुढील एका महिन्याच्या आत वाजेघर उपसा योजनेच्या माध्यमातून बारमाही पाणी या परिसरात मिळणार आहे. याठिकाणी शेती पंप सौर ऊर्जेवर चालणार असल्याने लाईट बिलाचा विषय देखील मार्गी लागणार आहे. वाजेघर वांगणी आणि शिवगंगा गावातील प्रकल्प आज शासन दरबारी प्रलंबित आहे. साखर गावापर्यत पाणी पुरेल असा आपला प्रयत्न सुरु आहे. परिसरात बऱ्याच रस्त्यांचे कामे झाली आहेत परंतु सततच्या पावसाने रस्ते खराब झाले. खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. पिंपरी ते वाजेघर भरम हा रस्ता, साखरचा पूल ही कामे आपणच केली. शेतीचे पाणी जर बारमाही आलं तर इथली शेती 'सुजलाम सुफलाम' होईल आणि रोजगाराचा प्रश्न देखील मिटेल.
वाजेघर खुर्द येथे येथील विविध विकासकाम होताहेत.
कारंजावणे ते वांगणी ते कुसगाव जवळपास साडे तीन कोटीचा रस्ता आता झालेला आहे. मांगदरी, कारंजावणे, मार्गसानी ते भोसले वाडी असा एकूण प्लॅन आहे त्यावरं काम ही सुरु आहे. महाराणी सईबाई साहेब यांच्या समाधीसाठी जवळपास २९ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. तसेच राजपट्टनवाडा ही देखील ऐतिहासिक वास्तू आहे अनेक शिवप्रेमी या भागात येत असतात त्यांना सर्व सोयी मिळाव्यात, जेणेकरून येणाऱ्यांची संख्या वाढेल आणि रोजगाराला देखील चालना मिळेल असा आपला प्रयत्न आहे. वाजेघरचे दोन्ही पूल होऊ नये यासाठी अनेक अदृश्य शक्तींनी प्रयत्न केले पण शेवटी चांगलं काम आहे हे काम झाल्याशिवाय राहत नाही आणि ते पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. असे थोपटे म्हणाले,
लव्ही बु, फनशी, अवळी, दादवली या सर्व गावात महाविकास आघाडीच्या काळात २० कोटी रुपयांची विकास कामे झाली. साखर ते चिरमोडी रस्ता आपल्या माध्यमातून झाला आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील येथे कमतरता नाही. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपर्यंत रस्ता होईल. वाजेघर उपसा सिंचन या गावासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपल्या विकास कामावर खुश होऊन येथील जनता आपल्या सोबत आहे.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.