जनतेची साथ व मिळालेला आशिर्वाद यामुळे विकास कामे मार्गी - संग्राम थोपटे

Maharashtra varta

जनतेची साथ व मिळालेला आशिर्वाद यामुळे विकास कामे मार्गी - संग्राम थोपटे


न्यूज वार्ता संपादक लेखणी

भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा)तालुक्यातील आंबवणे, बोरावळे, निगडे, वांगणी, कोळवडी, कातवडी, मांगदरी, करंजावणे, आडवली, आस्कवडी, मार्गासानी, कोंढवली, वांजळे, खरीव, खोडद, ब्राह्मणघर, वेल्हा या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

  यावेळी बोलताना ते म्हणाले या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीच्या पाण्यासाठी प्रामुख्याने गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी होत असून बरेसेच शेतीचे क्षेत्र ओलीता खाली येत आहे.

       त्याचबरोबर तालुक्यातील मुख्य असलेला चेलाडी पासून महाडला जोडला जाणार रस्ता यासंदर्भात केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या कडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच सदर रस्त्याचे रुंदीकरण व संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. 

    धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन विभागातील काही प्रश्न सोडविण्यात यश आले असून काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत याबाबत पाठपुरावा सुरूच आहे येणाऱ्या पुढील काळात आपल्या विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्याचे येणार असल्याचे चित्र स्पष्ट असल्याने पुढील काळात ते ही प्रश्न नक्कीच सोडविले जातील!

   

आपण आजवर केलेल्या सहकार्यामुळेच व दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून गावागावात, वाडीवस्तीमध्ये सामाजिक सभागृह, समाजमंदिर, शाळाइमारती, व्यायाम साहित्ये, रस्ते काँक्रिटीकरण यासारखी विकास कामे करता आली त्यामुळे विकास कामे करणे ही न संपणारी प्रक्रिया असून काही उर्वरित राहिलेली कामे प्रधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.


प्रसंगी संतोष रेणुसे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, दिनकर अण्णा सरपाले, संभाजी मांगडे, संदीप नगीने, तानाजी मांगडे, शैलेश वालगुडे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, मोहन गिरंजे, शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे, प्रकाश बढे, हनुमंत कारले, आशाताई रेणुसे, छायाताई काळे, दुर्गा चोरगे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.




To Top