पाल परिसरात आमदार संग्राम थोपटे यांचा दौरा यशस्वी
भोर विधानसभा मतदारसंघातील राजगड तालुक्यातील मेटपिलावरे, धनगरवस्ती, देवपाल, पाली, पाली बु, खाटपेवाडी, चऱ्हाटवाडी, पाथरदरा येथे उपस्थित राहून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी धनगरवस्ती येथे श्री गणेशाच्या आरती व दर्शन घेऊन दौऱ्याची सुरवात केली. यावेळी धनगर बांधवांचे प्रेम आशीर्वाद घेऊन भारवल्या सारखे झाले.
मेटपिलावरे हे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव असून, दौऱ्यावर असताना अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली, गावातील अंगणवाडीचे काम, गावातील मंदिरांचे काम, ग्रामपंचायत कार्यालयाचे काम आदी विकासकामे आपल्या माध्यमातून झाली. मेटपिलावरे, सणसवाडी, देवपाल, खोपडेवाडी येथे पंतप्रधान सडक योजनेतुन निधी उपलब्ध व्हावा त्यासाठी आपण प्रयत्न केला. आता मेटपिलावरे गावात गाडी येईल असा रस्ता झाला आहे.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.