कापुरहोळमध्ये 30,000 रुपयांचा मोबाइल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra varta

 कापुरहोळमध्ये 30,000 रुपयांचा मोबाइल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल




कापूरहोळ :-पत्रकार विठ्ठल पवार सर

कापुरहोळ (ता. भोर) येथे चायनिज खाताना 30,000 रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी गणेश मारूती खाटपे (वय 30, रा. कापुरहोळ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या व  मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी रात्री 9:00 ते 9:30 या वेळेत संगम पाचकाळे यांचे   मैत्री चायनिज सेंटरमध्ये फिर्यादी खाटपे आपल्या मित्रांसोबत चायनिज खात होते. चायनिज खाताना त्यांनी आपला सॅमसंग मोबाइल टेबलवर ठेवला होता. भोजन संपल्यावर मोबाइल घेण्यासाठी पाहिले असता, तो टेबलवरून गायब असल्याचे लक्षात आले.

सुमारे 30,000 रुपये किमतीचा हा मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर फिर्यादीने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक 29/2025 नुसार अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तपासासाठी पोलीस हवालदार मदने यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

या घटनेनंतर नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी आपले मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

To Top