यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धेत करंदी-खेबा शाळेचा नावलौकिक

Maharashtra varta




(न्यूज वार्ता ):-विठ्ठल पवार सर

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धा 2024-25 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंदी-खेबा या शाळेच्या विद्यार्थिनी ईश्वरी महेश खाटपे हिने 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

ईश्वरीच्या या यशामागे शिक्षक पंकज राठोड, शाम हेडगिरे, सुजाता तळेकर, मीनील कांबळे, आणि तानाजी नाईलकर यांचे प्रभावी मार्गदर्शन आहे.

भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आणि कामथडी केंद्राच्या केंद्रप्रमुख साधना गायकवाड यांनी ईश्वरीचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

ईश्वरीच्या यशामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण झाली असून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वत्र प्रशंसा होत आहे.

To Top