नसरापूर (विठ्ठल पवार सर)
कुरुंगवडी ता. भोर येथे श्री कुरुंजाई माता पौष पौर्णिमा उत्सव निमित्त 11 जानेवारी ते बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुरुंजाई माता चरिटेबल ट्रस्ट ने दिली आहे.
दिनांक 11 जानेवारी ते बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ऋग्वेद संहिता स्वाहाकार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, यासाठी ब्रह्मवृंद उपस्थित राहणार आहेत,
पौषपोर्णिमा उत्सव, मकर संक्रांत, नूतन वर्षं आरंभ करण्या निमित्त तसेच वैदिक व सनातन संस्कृतीच्या संवर्धन व संरक्षणासाठी ऋग्वेद संहिता स्वाहाकार शनिवार दि. ११ जानेवारी ते बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ असणार आहे
शनिवार ११ जानेवारी स. ८.०० ते दु. ३.००
गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, यज्ञशाला प्रवेश व यज्ञकुण्डपूजन, वेदपूजन, देवता स्थापन, अग्रिमंथन, नवग्रह हवन, ऋग्वेद संहिता स्वाहाकार तर
१२ जानेवारी रविवार स. ८.०० ते दु. ३.०० आवाहित देवता पूजन, ऋग्वेद संहिता स्वाहाकार
तर १३ जानेवारी सोमवार स. द. ८.०० ३.०० ते
आवाहित देवत्ता पूजन, ऋग्वेद संहिता स्वाहाकार.
तर १४ जानेवारी मंगळवार स. ८.०० ते दु. ३.०० आवाहित देवत्ता पूजन, ऋग्वेद संहिता स्वाहाकार कार्यक्रम होणार आहे.
१५ जानेवारी बुधवार रोजी दु. ८.०० ३.०० ते आवाहित देवता पूजन, ऋग्वेद संहिता स्वाहाकार, बलीदान, पूर्णाहुती, वसोर्धारा सूक्त, अभिषेक, आरती, मंत्रपुष्पम्, आशीर्वचन, ऋत्विज व यजमानांचा सन्मान. हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी हे ब्रह्मवृंदवेदमूर्ती श्री. शांताराम जोशी (श्री गायत्री गुरुकुलम्, धायरी)
वेदमूर्ती श्री. सुदर्शन देवताळकर,वेदमूर्ती श्री. आदित्य माईणकर वेदमूर्ती श्री. पराशर जोशी,वेदमूर्ती श्री. गोपाळशास्त्री जोशी,(आम्नाय वाटिका ऋग्वेद गुरुकुल, वीरवाडी) वेदमूर्ती श्री. मयुर जोशी,वेदमूर्ती श्री. प्रचेतस जोशी वेदमूर्ती श्री. मिलिंद संत उपस्थित राहणार असल्याचे माहितीश्री कुरुंजाई माता चॅरिटेबल ट्रस्ट कुरुंगवडी, यांनी दिली आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले आहे.