भोर (प्रतिनिधी):-
28 जानेवारी 2025 रोजी भोर तालुक्यातील शहर व डोंगरी दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिद्द फाउंडेशन भोर आणि श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भोर तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा असेहन जिद्द फाउंडेशनचे अध्यक्ष सौ कविताताई खोपडे यांनी केले आहे.
ही आरोग्यसेवा दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी, मंगळवारी, सकाळी 10 वाजता रामबाग हॉल, रामबाग चौक, भोर येथे आयोजित केली जाईल.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांनी 9022338684 किंवा 9209662255 या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी.
(कविताताई खोपडे यांचे आवाहन:
या उपक्रमाबाबत जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. )
शहर आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा जिद्द फाउंडेशनचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना नव्या आशेची किरणे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिबिराला वेळेत उपस्थित राहून आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा सहभाग नोंदवा!
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
जाहिरात क्र;-23