शिक्षक समितीची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सभा संपन्न; राज्यातील शिक्षणक्षेत्राशी निगडित प्रश्नांवर धोरणात्मक चर्चा

Maharashtra varta



कापूरहोळ ,● विठ्ठल पवार सर●दि.21 :

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी सभा धांगवडी (भोर ) येथील बळीराजा मंगल कार्यालयात संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


यावेळी राज्य स्तरावरील विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यालय वास्तव्याच्या जाचक अटीच्या संदर्भात निर्माण झालेली स्थिती, संच मान्यता निकषामुळे दुर्गम भागातील शाळांची स्थिती, शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांनी बोलावलेल्या बैठकीतील मुद्दे, शा.पो.आ. धोरण व त्या अनुषंगाने होणाऱ्या शाळा भेटी , गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले जाणारे अनेकविध उपक्रम , नवीन अभ्यासक्रम अशा अनेक प्रश्नांबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. याशिवाय शालेय शिक्षण व ग्राम विकास विभागाच्या मंत्री महोदयांना शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्नांबाबत संघटनात्मक भूमिका मांडण्यासाठी लवकरच बैठक लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.


या  सभेत सभासद नोंदणी, संघटनात्मक बांधणी , श्रमिक कामगार कायद्याचे अंतर्गत संघटनात्मक हिशोब, कागदपत्रे व दप्तर अद्ययावत ठेवणे, मुदत संपलेल्या जिल्हा व तालुका शाखांची अधिवेशने आयोजित करुन संघटनात्मक पुनर्बांधणी करणे इत्यादी बाबतीत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी मार्गदर्शन करुन जिल्हावार आढावा घेतला. यावेळी राज्य नेते उदय शिंदे, राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांदळकर, विलास कंटेकुरे , महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष वर्षाताई केनवडे , संपर्क प्रमुख किसन बिरादार,राज्य प्रवक्ते नितीन नवले, न.पा. /म.न.पा.आघाडी प्रमुख सुधाकर सावंत , राज्य अडीटर पंडित नागरगोजे, पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष सुनील भामरे , उपाध्यक्ष चंद्रकांत डोके यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच विविध जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक समिती  राज्यातील जिल्हा शाखेचे अध्यक्ष  यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सादर करताना विविध विषयावर आपली भूमिका मांडली. . सदरची कार्यकारिणी सभा यशस्वी करण्यासाठी पुणे शाखेचे अध्यक्ष सुनील वाघ , सरचिटणीस संदीप जगताप , नेते शरद निंबाळकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब लांबी , कोषाध्यक्ष सुनील लोणकर यांच्यासह भोर , वेल्हा , पुरंदर तालुक्यातील शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हा अत्यंत  देखणा  सोहळा , राज्य  कार्यकारिणी  बैठक , पुणे  जिल्हा  कार्यशाळा , भोर - वेल्हा  शिक्षक  समितीचे  त्रेवार्षिक  अधिवेशन संपन्न झाले.


  अत्यंत  कमी  वेळेत  नियोजन , शिक्षक  समितीच्या  भोर  आणि  वेल्हा  शाखेचे  परिश्रम , पुणे  जिल्हा  शिक्षक  समिती  चे  आवाहनास  उदंड  प्रतिसाद  दिला असल्याचे दिसून आले. यामुळेच  शक्य  झालेली  सभासद  बंधू - भगिनींची  उपस्थिती मोठी गर्दी होती, त्यामुळे  राज्यातील  पदाधिकारी , विविध  जिल्हा  अध्यक्ष  / सरचिटणीस  यांनी  कार्यक्रम  अत्यंत  देखणा  झाला  असल्याचे  समक्ष  आणि  फोनवरून कळविले  आहे. सत्कार  समारंभात  बुके , शाल  ऐवजी  पुस्तके  भेट  दिल्याबद्दल  राज्यातील  प्रमुख  लोकांनी  काल  पुणे  भेटीत  समाधान  व्यक्त  केले. 

      राज्य  कार्यकारिणी  बैठक  होत  असताना  शिस्त  अत्यावशक  होतीच.  जेवण  खूप  रूचकर  झाले  होते  अशी  सगळ्यांचीच  प्रतिक्रिया आली. याच दिमाखदार  सोहळ्यात जिल्हा कार्यकारिणी  विस्तार  झाला. भोर - वेल्हा  नूतन  पदाधिकारी  निवडी  पार  पडल्या. राज्य  शाखेवर  काहींना  बढती  मिळाली, काही  नवीन  सहकाऱ्यांनी  शिक्षक  समितीत  प्रवेश  केला. अशा आणि नवनियुक्त  सगळ्यां  नूतन  पदाधिकारी  यांचे   अभिनंदन करण्यात आले .  पुणे  जिल्हा  शिक्षक  समिती  ची  समितीप्रहार  दिनदर्शिका  2025  याच सोहळ्यात, सलग  दुसऱ्या  वर्षी  मान्यवरांच्या  शुभहस्ते  प्रकाशित  झाली, त्यासाठी  जिल्ह्यातील  विविध  तालुका शाखांनी  भरघोस  निधी  उपलब्ध  करून  दिला,  मेहनत  घेतली. त्या  सर्वांचे  पुणे  जिल्हा  शिक्षक  समिती  कडून    आभार मानण्यात आले.

To Top