मुंबई: आज देवगिरी निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची जिद्द फाउंडेशनचे अध्यक्षा कविताताई अरुणनाना खोपडे यांनी भेट घेऊन भोर शहराशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत भोर शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे विषय मांडण्यात आले, ज्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
भेटीत हे महत्त्वाचे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. त्यात पुणे (कात्रज) ते भोर PMPLM बस सेवा सुरू करणे: भोर शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी प्रवासाच्या सोयीसाठी तातडीने बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या सुविधेमुळे स्थानिक रहिवाशांना अत्यंत उपयुक्त पर्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नगरपरिषद प्रशासनातील त्रुटी:
वीज, पाणी, स्वच्छता, अतिक्रमण आणि नगरपरिषद प्रशासनातील मुजोर अधिकारी यांच्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली.
(उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद:)
आदरणीय अजितदादा पवार यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच भोर शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भोरच्या विकासासाठी अखंड प्रयत्न:
भेटीत उपस्थितांनी भोर शहराच्या नागरिकांसाठी केलेले हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. या चर्चेतून मिळालेले सकारात्मक आश्वासन भोरच्या विकासाला नवा आयाम देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि भोरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुरू असलेले हे प्रयत्न भविष्यातही असाच वेग घेतील. असे जिद्द फाउंडेशनचे अध्यक्ष कविताताई खोपडे यांनी बोलताना सांगितले.