भोर नेटवर्क:-
महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या नवीन शाखेचे आज भोर शहरात मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या विशेष सोहळ्याला बँकेचे CEO वैभव माने सर, काकडे सर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता ताई खोपडे यांनी शाखेला भेट देऊन कर्मचार्यांशी सविस्तर संवाद साधला व त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
बँकेचा हा नवीन उपक्रम समाजसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विविध सामाजिक उपक्रम आणि प्रगत सुविधांसह व्यंकटेश मल्टीस्टेट बँक स्थानिक नागरिकांसाठी आर्थिक स्थैर्याचे एक आशास्थान ठरणार आहे.
कविता ताई खोपडे यांच्या हस्ते दिलेल्या शुभेच्छा व प्रेरणादायी संवादामुळे या उपक्रमाला आणखी ऊर्जा मिळाली आहे. बँकेचा हा पुढाकार सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवतो आणि इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
(भविष्यातील वाटचाल:
व्यंकटेश मल्टीस्टेट बँक स्थानिक उद्योगधंदे, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना भक्कम पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध आहे. बँकेचा समाजातील योगदान वाढविण्याचा हा उपक्रम भविष्यात अनेकांना प्रेरित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे!)