भोर: विठ्ठल पवार सर
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने दुसऱ्या बॅचचे तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर आणि सिदोजि थोपटे विद्यालय खानापूर येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा(पायाभूत व शालेय शिक्षण स्तर), शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगती पत्रक या विषयावर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या दुसरा टप्पा बॅचच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती भोरचे उच्चश्रेणी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे साहेब, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे साहेब, विस्तार अधिकारी हुमेरा परवीन शेख, विषय साधनव्यक्ती व प्रशिक्षण समन्वयक सुनील गोरड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक श्री सुनील गोरड सर यांनी केले.
या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून प्रा.विक्रम शिंदे , रावसाहेब चौधरी ,महादेव मांदळे ,राहुल शेटे ,शरद दळवी,संतोष बगले ,देवराव कांबळे ,अमर क्षीरसागर ,पूनम दोरगे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणासाठी एकूण 250 शिक्षक उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप केले. प्रशिक्षणा दरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींना दोन वेळेचा चहा व दुपारचे सुग्रास भोजन श्री गणेश केटरर्सचे प्रशांत कडू यांनी उपलब्ध करून दिले.
हे प्रशिक्षण एकूण चार टप्प्यात देण्यात येणार असून तिसरा टप्पा 24 ते 29 फेब्रुवारी, चौथा टप्पा 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले असून भोर तालुक्यातील पहिली ते बारावी इयत्तांना शिकवणारे सर्व शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.
दरम्यान केंद्र प्रमुख मनोज पुरंदरे , गट समन्वयक प्रभावती कोठावळे ,अंजना वाडकर यांनी भेट दिली आहे.