चिखलगाव गावासाठी विकासाचा नवा अध्याय!

Maharashtra varta




(मुख्य संपादक न्यूज वार्ता)

चिखलगाव  गावासाठी विकासाचा नवा अध्याय!

नळपाणी पुरवठा, उपसा जलसिंचन, आरोग्य सेवा आणि भव्य विकासकामांचे भूमिपूजन मा.आ. संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते संपन्न!

भोर-राजगड-मुळशीचे लोकप्रिय मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून फक्त चिखलगाव  गावासाठी तब्बल ₹४ कोटी २५ लाखांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

मंजूर विकासकामे:

आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम – ₹७५ लाख
महादेव मंदिराजवळ साकव बांधकाम – ₹६० लाख
अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण
कुस्ती आखाडा आणि गटार बांधकाम
नळपाणी पुरवठा योजना व उपसा जलसिंचन प्रकल्प
सामाजिक सभागृह, सभा मंडप, संरक्षक भिंत बांधकाम
स्मशानभूमी शेड आणि इतर महत्त्वाची विकासकामे

मा. संग्रामदादा थोपटे यांचे प्रतिपादन:

"या भागातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. आरोग्य सेवा उपलब्ध करणे ही पुण्याची सेवा आहे, त्यामुळे या उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील."

समाजकार्याची आठवण आणि सन्मान:

कार्यक्रमात स्व. सुखदेव कुंभार यांच्या समाजकार्याची आठवण काढून त्यांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या एकनाथराव गायकवाड आणि आनंदराव धोंडे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर:

या भव्य कार्यक्रमाला भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, युवा नेते अनिल सावले, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष कोंढाळकर, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष संजयआबा मळेकर, हरिभाऊ चिकणे, एकनाथ गायकवाड, आनंदराव धोंडे, पांडुरंग धोंडे, शंकरनाना धोंडे, दिनकर धनावडे, रघुनाथ धोंडे, किसनबुवा धोंडे, राजाराम धोंडे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र खोपडे, शिवाजी नाटंबे, शिवाजी सासवडे, भाऊ परखंदे, सुनील जेधे, संतोष केळकर, सोपान तांगडे, शंकर रावडे, भाऊसो जाधव, अर्जुन दिघे, संदीप दत्वे, संतोष नवघणे, राजेंद्र निगडे, सर्जेराव कोंढाळकर, काका कण्हेरकर, संतोष खोपडे, तसेच चिखलगावचे सरपंच सुरेश धोंडे, उपसरपंच मनीषा कुंभार आणि विविध मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🌿 मा. संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली चिखलगाव  गावचा जलद गतीने विकास सुरू असून, आगामी काळात आणखी मोठ्या योजना राबवल्या जाणार आहेत!




To Top