शिक्षक क्षमता वृद्धीचे प्रभावी प्रशिक्षण – श्री. देवराव कांबळे सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.

Maharashtra varta



पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2025 – 

शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी आणि अध्यापन कौशल्य वृद्धीसाठी भोर पंचायत समिती विकास गटातील घेण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत  प्रशिक्षक श्री. देवराव कांबळे सरांनी आपल्या प्रभावी शैलीतून शिक्षकांना मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा संपूर्णपणे प्रबोधनात्मक आणि मनोरंजक पद्धतीने पार पडली. शिक्षकांना आधुनिक अध्यापन तंत्र, विद्यार्थ्यांशी संवाद, प्रभावी शिकवण्याच्या पद्धती, ताणतणाव व्यवस्थापन आणि प्रेरणादायी अध्यापनाचे तत्त्वज्ञान यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन मिळाले.


मनोरंजक शैलीतून प्रेरणादायी शिकवण


श्री. देवराव कांबळे सरांनी केवळ व्याख्यान न देता, विविध कथा, उदाहरणे, उपहासात्मक पण विचार  करायला लावणारे किस्से आणि प्रत्यक्ष सहभागातून शिकवण दिली. त्यामुळे प्रशिक्षणात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. "सखोल ज्ञान, संवाद कौशल्य आणि शिक्षकांची सकारात्मक मानसिकता यावरच विद्यार्थ्यांचा विकास अवलंबून असतो," असे त्यांनी स्पष्ट केले.


शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रशिक्षणाच्या शेवटी शिक्षकांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. "हे प्रशिक्षण आमच्या अध्यापन पद्धतीत नक्कीच मोठा बदल घडवेल," अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिली. "असे उपक्रम सातत्याने व्हावेत," अशी मागणी उपस्थित शिक्षकमंडळींनी केली.


शिक्षणाच्या नव्या वाटा

हा उपक्रम शिक्षकांसाठी नव्या विचारांची दिशा देणारा आणि शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. श्री. देवराव कांबळे सरांचे हे प्रशिक्षण शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणारे ठरेल, यात शंका नाही. असे पुणे जिल्हा शिक्षक समिती सरचिटणीस संदीप अप्पा जगताप यांनी व्यक्त केले

To Top