भोरमध्ये जिद्द फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – प्रेरणादायी महिलांचा गौरव व विविध उपक्रमांचे आयोजन●

Maharashtra varta

 


पुणे (मुख्य संपादक) – 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिद्द फाऊंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे यांच्या संकल्पनेतून भोर तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच भोर नगरपालिकेतील महिला कर्मचारी व तालुक्यातील बस वाहक महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना मोफत विमा कवच व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

भोर तालुक्यातील यांचा विशेष गौरव याप्रसंगी करण्यात आला.


 (प्रेरणादायी महिलांचा गौरव)

तालुक्यात विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अंकिता शिवतरे (सूत्रसंचालन, निवेदन, नृत्य, नाट्य व अभिनय), राष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी राजेंद्र रोमन गाढवे, राष्ट्रीय कथ्थक पदक विजेत्या रश्मी म्हसवडे, तसेच राष्ट्रीय धावपटू अंकिता इंगुळकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.)


 (याही महिलांचा गौरव

भोर तालुक्यातील बस वाहक महिला व भोर नगर परिषदेतील कर्मचारी महिला यांचा गौरव करत त्यांना मोफत विमा देऊन आणि   प्रशस्तीपत्रक, सन्मानाचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.)


(रील्स स्पर्धेचा उत्साहपूर्ण बक्षीस वितरण सोहळा) 

जिद्द फाऊंडेशनच्या वतीने भोरच्या वैभवशाली परंपरा व निसर्गसौंदर्यावर आधारित रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यामध्ये विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.)

स्पर्धेतील विजेते:

१) प्रथम क्रमांक – विजय कुटे

२) दुसरा क्रमांक – अनिश कंक

३) तिसरा क्रमांक – सोमेश घोणे व सुशांत मोहिते (संयुक्त विजेते)

४) चौथा क्रमांक – कमलेश खोपडे

५) पाचवा क्रमांक – प्रज्वल आवाळे

स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी भोर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. शिलाताई खोत, सौ. एड. सुवर्णाताई बदक (नोटरी, भारत सरकार), माजी नगराध्यक्षा दीपाली शेटे, स्वाती गांधी, अशोक खुटवड, तसेच भोर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

(उद्योग व सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न)

यावेळी बोलताना जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे म्हणाल्या, "येत्या काळात भोर तालुक्यातील महिलांसाठी उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्याचा मानस आहे. याशिवाय, भोरच्या समृद्ध परंपरा आणि निसर्गसौंदर्याला उजाळा देण्यासाठी अशाच उपक्रमांचे आयोजन करत राहू. स्पर्धकांनी आपल्या रील्समधून भोरच्या विविध पैलूंना प्रभावीपणे सादर केले आहे, याचा मला अभिमान वाटतो. भविष्यात अशा स्पर्धांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही निर्धार केला आहे.")


या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन  निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, तर प्रास्ताविक जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले.

To Top