हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विविध उपक्रम
पुणे (प्रतिनिधी):-(विठ्ठल पवार )
चैत्र शुद्ध, सप्तमी, ३८० वा हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह व स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोचन, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (मावि) पुस्तिकेचे अनावरण, रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन●
छत्रपती शिवाजी महाराजांनी 'चैत्र शुद्ध सप्तमी' १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री. क्षेत्र रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या घटनेला एकुणात भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. २०२५ हे वर्ष 'हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिनाचे ३८० वे वर्ष आहे. या वर्षी सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी, ता. भोर, जि. पुणे येथे केले आहे.
सदर दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था रायरेश्वर, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्यभूमी प्रतिष्ठान, स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषतः मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. चैत्र शुद्ध सप्तमी तिथीनुसार हा वर्षी शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल २०२५ ला हिंदवी स्वराज्य शपथ भूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स. ६.०० ते दु. २.०० वा. पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे जसे कि शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दग्धाभिषेक, गढ़ आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, ह.भ.प. श्री. राहुल महाराज पाठे यांचे विद्यार्थी मिरवणूक, हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह व हिंदवी स्वराज्य स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोच्चार, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेशन (मावि) अर्थात परकीय जैविक आक्रमणविरोधी चळवळी विषयक पुस्तिकेचे अनावरण, श्री. लक्ष्मण शिंदे लिखित रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान, श्री. संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान, शिवशाहीर डी. पुरुषोत्तम राऊत यांचे पोवाडा सादरीकरण, स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन, अश्या अनेक उपक्रमांची पर्वणी असणार आहे. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाच्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या सखेने उपस्थित राहणार आहेत
सर्व सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक व पर्यावरणीय पार्श्वभूमी लक्षात घेता या विषयांबाबत जागृत आणि संवेदनशील असलेल्या आपल्या वृत्तमाध्यमातून या विशेष उपक्रमांबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचता यावे या प्रामाणिक आणि नम्र विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
युवराज जेधे
९५९५४०५४०६
श्री. सुनील चिकणे
९००४३९४०६१
श्री. सचिन देशमुख
९२७२७१८००८
श्री. दत्तात्रय जंगम
९२२४६३१२०४
डॉ. सचिन अनिल पुणेकर